तन बाल शिक्षण संघ, कोसबाड संस्थेच्या ताराबाई मोडक विद्यानगरीत २४ डिसेंबरला संस्थेचा ७८ वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. त्यावेळी माननीय सौ. दमयंतीबेन तन्ना व माननीय श्री. प्रदीपभाई तन्ना विश्वस्त श्री. निमेश तन्ना चॅरिटेबल ट्रस्ट, मुलुंड, मुंबई यांच्या हस्ते अन्नपूर्णा भोजनालयाचे उदघाटन करण्यात आले.

याचवेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले व इयत्ता दहावी तसेच बारावीच्या कला व वाणिज्य शाखेतील प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना पारितोषकाचे वितरण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमार्फत करण्यात आले.