डहाणू – तलासरी तालुका कला क्रीडा महोत्सव २०२३-२४

डहाणू – तलासरी तालुका कला क्रीडा महोत्सव २०२३-२४

कॉ.आमदार श्री.विनोद निकोले डहाणू विधानसभा डहाणू – तलासरी तालुका कला क्रीडा महोत्सव २०२३-२४ नुकताच पार पडला. यात १७ वर्ष वयोगटाखालील स्पर्धेत पदमश्री अनुताई वाघ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, तसेच १७ वर्ष वयोगटावरील स्पर्धेत डॉ. शशिकला पोतनीस कला व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध सांघिक व व्यक्तिगत स्पर्धांमध्ये उत्तम यश मिळवले.

नूतन बाल शिक्षण संघ, कोसबाडचा ७८ वा वर्धापनदिन

नूतन बाल शिक्षण संघ, कोसबाडचा ७८ वा वर्धापनदिन

तन बाल शिक्षण संघ, कोसबाड संस्थेच्या ताराबाई मोडक विद्यानगरीत २४ डिसेंबरला संस्थेचा ७८ वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. त्यावेळी माननीय सौ. दमयंतीबेन तन्ना व माननीय श्री. प्रदीपभाई तन्ना विश्वस्त श्री. निमेश तन्ना चॅरिटेबल ट्रस्ट, मुलुंड, मुंबई यांच्या हस्ते अन्नपूर्णा भोजनालयाचे उदघाटन करण्यात आले.

याचवेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले व इयत्ता दहावी तसेच बारावीच्या कला व वाणिज्य शाखेतील प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना पारितोषकाचे वितरण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमार्फत करण्यात आले.

नूतन बाल शिक्षण संघ वर्धापन दिन

आपणांस आग्रहाचे आमंत्रण

नूतन बाल शिक्षण संघ संस्थेचे ७८ वर्धापन दिन येत्या २४ डिसेंबर २०२३ ला पदमभूषण ताराबाई मोडक विद्यानगरी कोसबाडला येथे संपन्न होणार आहे. यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सौ. दमयंतीबेन तन्ना व श्री. प्रदीप तन्ना यांची उपस्थिती असेल.

तेव्हा नक्की या….

लेडीज सायकलींचे वाटप

लेडीज सायकलींचे वाटप

लेडीज सायकलींचे वाटप

आपल्या माध्यमिक शाळेतील चार दुरून पायी येण्यार्या मुलीना नीआन फाउंडेशन तर्फे लेडीस सायकली चे वाटप नीआन च्या GM श्रीमती संध्या पाटिल यांच्या तर्फे करण्यात आले.