
पद्मभूषण ताराबाई मोडक व पद्मश्री अनुताई वाघ ह्यांनी पूर्व प्राथमिक व प्राथमिक शिक्षण क्षेत्रात अत्यंत मोलाचे कार्य केले आहे. त्यांच्या कार्याचे महत्त्व लक्षात घेता ह्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांना प्रोत्साहन मिळावे, त्यांचा गौरव व्हावा या उद्देशाने २०१७ सालापासून विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येतात. सन २०२३- २४ सालचा आदर्श शिक्षक श्री. राजेंद्र भास्कर आहिरे (प्राथमिक शिक्षक) जि.प. प्रा. शाळा शंकरपाडा, पो. घोलवड, ता. डहाणू जि. पालघर यांना व विशेष संस्था म्हणून वाणगाव एज्युकेशन सोसायटी, वाणगाव, ता.डहाणू, जि. पालघर या संस्थेस पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान श्री. चंद्रगुप्त पावसकर, अध्यक्ष, नूतन बाल शिक्षण संघ, कोसबाड तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. किरण सावे, प्राचार्य, सोनोपंत दांडेकर कॉलेज, पालघर हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
