यशवंतराव मुक्त विद्यापीठाच्या मुंबई केंद्राच्या क्रीडा स्पर्धा कल्याण  या ठिकाणी  पार पडल्या. या स्पर्धेमध्ये आपल्या डॉ शशिकला पोतनीस कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून यश मिळवले. मुलींचा खो-खो  चा संघ हा विभागीय स्तरावर निवड करण्यात आला. त्याच प्रमाणे कब्बडी संघामध्ये 1) सुशीला वांगड 2) कोमल दोल्हारे 3) शबीना दाडोडा 4) जागृती करदाले या 4 मुलींची विभागीय स्पर्धेत निवड करण्यात आली,

तसेच मुलांमध्ये खो खो संघात  1) स्वप्नील पटारा 2)ऋतिक धोडी 3) रिकी वळवी हया खेळाडूंची निवड करण्यात आली तर व्हॉलीबॉल मध्ये 1) रिकी वळवी 2)कैलास बात्रा या खेळाडूंची निवड करण्यात आली. सर्व खेळाडूंचे महाविद्यालया कडून हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा