नूतन बाल शिक्षण संघाच्या प्राथमिक शिक्षणाच्या अभ्यास व संशोधन संकुलासाठी देणगी प्रदान समारंभ.
इंडसर्च, पुणे संस्थेच्या हॉलमध्ये सोमवार दि. १५ मे २०१७ रोजी नूतन बाल शिक्षण संघाच्या प्राथमिक शिक्षणाच्या अभ्यास व संशोधन संकुलासाठी देणगी प्रदान समारंभ पार पडला. संस्थेला डॉ. एम. कटककर यांनी रु. साठ लाख देणगी दिली. समारंभाचे अध्यक्ष, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू श्री अरुण निगवेकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की डॉ.कटककर यांच्यासारखी माणसे समाजाचे भूषण असतात. उच्च शिक्षणात गुणात्मक प्रगती होण्यासाठी प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्कम असणे आवश्यक आहे. या साठी नूतन बाल शिक्षण संघासारख्या संस्था यशस्वी होणे आवश्यक आहे.समाजानेच समाजाची मदत करावी. पालक हे ही शिक्षणाच्या साखळीतील एक भाग आहेत. नवीन तंत्रज्ञान आवश्यक आहे. इतर शिक्षण संस्थांनी नूतन बाल शिक्षण संघापासून प्रेरणा घ्यावी, तसेच समाजातील लोकांनी श्री. एम. कटककर यांच्यापासून प्रेरणा घ्यावी व पुढील पिढीचे भविष्य उज्वल करावे.
कार्यक्रमासाठी श्रीमती मीना चंदावरकर, डॉ.सौ प्राची जावडेकर, गरवारे महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. वाणी, प्रा.अ.गो. गोसावी,संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.