“इथल्या मुलांना अभ्यासासाठी आणि इतर वाचनासाठीचे सर्व साहित्य त्यांना इथे उपलब्ध
व्हावे, यासाठी स्वतःचा छापखाना असावा,” असे ताराबाईंचे स्वप्न होते. त्या नेहेमी म्हणत,
“मुळक्षरांनी मुलांच्या भोवती कयम फेर धरला पाहिजे, त्यांच्या डोळ्यांसमोर अक्षरें नाचली
पाहिजेत.” अनुताईंनी ताराबाईंचे स्वप्न पूर्ण केले. गेली कित्येक वर्षे ग्राम-बाल- शिक्षा केंद्रात स्वतःचा
छापखाना चालू आहे. इथले सर्व साहित्य या छापखान्यात छापूनच, ग्राम-बाल- शिक्षा केंद्रातर्फे प्रकाशित
केले जाते. बदलत्या काळाला अनुसरून या छापखान्यात नवीन बदल करण्यात आले आहेत. इथेच पुस्तक-बांधणी,
फोटोकॉपी आणि लॅमिनेशन यांचीही व्यवस्था आहे.