बालवाडी
कोसबाड परिसरातील पाड्यांवर केंद्रातर्फे चालवण्या जाणार्या ७ बालवाड्या आहेत.
यातील प्रत्येक बालवाडीमध्ये जवळपास ४० विद्यार्थी आहेत.
कोसबाड येथे चालवली जाणारी ‘केंद्र बालवाडी’ ही ‘आदर्श बालवाडी’ म्हणून चालवली जाते.
इतर बालवाडी असलेले पाडे –
चिंबावे
नारळीपाडा
दळवीपाडा
डोंगरी पाड
खेडपाडा
भोनारपाडा
प्रत्येक बालवाडीमध्ये एक प्रशिक्षित शिक्षक व दोन सहाय्यक आहेत. सहाय्यकांची संख्या बालवाडीतील मुलांच्या संख्येवर अवलंबून असते. सर्व मुलांना दुपारच्या जेवणाच्या वेळी पौष्टिक आहार पुरवला जातो.
बालवाड्यांमध्ये उपयोगात येणारी बहुतेक सर्व शिक्षणिक साधने ही त्या परिसरातील उपलब्ध असलेल्या वस्तूंचा आणि गोष्टींचा उपयोग करून बनवण्यात आलेली असतात. बालवाड्यांमध्ये
शिकवली जाणारी गाणी पण त्यांच्या जीवनपद्धतीवर आधारित बनवलेली आहेत. यामुळे आदिवासी मुलांमध्ये एक प्रकारचा आपलेपणा व आत्मविश्वास निर्माण होतो.
अनेकदा आदिवासी भांषांमध्ये प्रचलित असलेली गाणी घेऊन त्यांच्यावर मराठी भाषेचे संस्कार करून नवीन गाणी बनवली जातात. तसेच गोष्टी पण आसपासचा परिसर, जीवन-पद्धती यांच्याशी सांगड घालून बनवल्या जातात. त्यामुळे मुलांना त्या गाणीं व गोष्टींबद्दल आपलेपणा वाटतो, व समजायला पण सोपे जाते.
नेमून दिलेल्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त मुलांना शब्द-संग्रह, कला व हस्त-कौशल्य, अंक मोजणी, आणि साम्य ज्ञान इत्यादी पण शिकवले जाते.या बालवाड्यांना कोणत्याही प्रकारचे सरकारी अनुदान नाही. संस्थेला मिळालेल्या देणग्यांवरच त्या चालवल्या जातात.