आपण पूर्व परवानगी घेऊन येथे शैक्षणिक सहली आयोजित करू शकता.
आवश्यकतेनुसार बालवाडी शिक्षकांसाठी कार्यशाळा आयोजित केल्या जातात.
संस्थेची स्वतःच्या मालकीची शेतजमीन आहे. त्याची योग्य निगा राखली जाते. या मध्ये काही
प्रमाणात भात-शेती होते. तसेच आंबा, चिक्कू, नारळ अशा फळझाडांची पण जोपासना केली जाते.
D.Ed. च्या विद्यार्थांसाठी ‘शेती’ हा कार्यानुभवाचा एक विषय आहे. आमची शेती त्यांना सुयोग्य
अनुभव देते.
स्थानिक लोकांच्या सहाय्याने वारली चित्रकलेचे वर्ग सुरू केले आहेत. श्री. चंद्रगुप्त पावसकर यांनी
केलेल्या अर्थ-सहाय्यामुळे हे शक्य झाले आहे.