Anutai Wagh

नवी आव्हाने ------

      भारत सरकारने  कोसबाडच्या टेकडीवरील नूतन बाल शिक्षण संघामध्ये होणार्‍या शैक्षणिक प्रयोगांची दखल घेतली व त्यापासून स्फूर्ती घेऊन अशाच प्रकारच्या संस्था भारतभर सुरू केल्या. आता नूतन बाल शिक्षण संघासमोर एक नवे आव्हान उभे राहिले –

१)      ही शिक्षण प्रणाली  त्यातील प्रत्यक्ष जीवनाशी निगडित दृष्टिकोण न बदलता सर्वसमावेशक, सर्वंकश आणि आधुनिक बनवणे.

२)      संस्थेमध्ये बाल शिक्षणाचे एक जागतिक संशोधन केंद्र बनवणे.

उद्दिष्टे ---

      पद्मभूषण तराबाई मोडक व पद्मश्री अनुताई वाघ यांनी एक स्वप्न पाहिले होते, “पूर्व प्राथमिक व प्राथमिक शिक्षण विद्यार्थ्याभिमुख असावे. त्यांच्या जीवनाशी निगडित असावे, जेणेकरून ते विद्यार्थंना समजायला सोपे होईल.” ते स्वप्न त्यांनी साध्य केले. आता त्यांचे हे स्वप्न आणखी पुढे नेत, आम्हाला माध्यमिक शिक्षणालाही लागू करायचे आहे.

      नूतन बाल शिक्षण संघ, कोसबाड येथे, ज्यां अभ्यासूंना राष्ट्रीय व आंतर्राष्टीय स्तरावर शोध निबंध लिहायचे आहेत, तसेच  नवीन शैक्षणिक कल्पनांवर काम करायचे आहे अशा लोकांसाठी, एक संपूर्ण प्रयोग सुविधा स्थापन करायची आहे.

सर्व अधिकार © नूतन बाल शिक्षण संघ, Kosbad राखीव. डिझाईन & विकसित applex360.in
Privacy Policy   Terms & Condition