Anutai Wagh

पाळणाघरे.


बालवाड्य़ांच्या बरोबरच पाळणाघरेही चालवली जातात. आदिवासी घरांमध्ये अनेकदा मोठ्या भावंडाला त्याच्या लहान भावंडांचा सांभाळ करण्यासाठी घरी रहावे लागते. बालवाडीमध्ये शिकायला येता येत नाही. अशा मुलांना शिकायला मिळावे म्हणून त्यांच्या लहान भावंडांसाठी पाळणाघरे सुरू केली आहेत. पाळणाघर आणि बालवाडी मिळून या मुलांचा प्रश्न सुटतो, व ते अभ्यासाला वेळ देऊ शकतात. या पाळणाघरांमध्ये सहा महिन्याच्या आर्भकापासून ते अडीच वर्षाच्या मुलापर्यंच्या बालकांना प्रवेश दिला जातो. त्यांची योग्य प्रकारे काळजी घेतली जाते.

या पाळणाघरांमध्येही प्रत्येकी एक प्रशिक्षित शिक्षक व दोन सहाय्यक आहेत. सहाय्यकांची संख्या पाळणाघरांमधील मुलांच्या संख्येवर अवलंबून असते. सर्व मुलांना दुपारच्या जेवणाच्या वेळी पौष्टिक आहार पुरवला जातो. अर्भकांसाठी लागणार्‍या विशिष्ठ आहाराची पण व्यवस्था आहे.

बालकांसाठी आरामदेय पाळणे तसेच झोळ्यांची व्यवस्था आहे. त्यांमध्ये बालके सुखाने व आनंदाने झोपतात. प्रत्येक १० मुलांसाठी एक आया व एका मदतनीसाची व्यवस्था आहे. ही पाळणाघरे पण आमच्या उदार देणगीदारांच्या मदतीनेच चालतात.

सर्व अधिकार © नूतन बाल शिक्षण संघ, Kosbad राखीव. डिझाईन & विकसित applex360.in
Privacy Policy   Terms & Condition