हा अभ्यासक्रम ताराबाईंनी सुरू केला. सुरुवातीला १९६४ ते १९९८, हा अभ्यासक्रम केंद्रीय सरकारच्या अधिकारात होता. २००३ पासून हा अभ्यासक्रम स्वायत्त झाला आहे.
या अभ्यासक्रमात दर वर्षी २० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
सकाळी ९ ते १२ या वेळात प्रशिक्षणार्थींना बालवाडीत प्रत्यक्ष कार्यानुभव दिला जातो. त्यानंतर भोजनाच्या सुटीनंतर प्रशिक्षणार्थींसाठी ‘बालेवाडी यशस्वीरित्या कशी चालवावी’, या विषयावर
शैक्षणिक व्याख्याने आयोजित केली जातात. हस्त-व्यवसाय व कौशल्य या विषयांतर्गत, शिवण, कॉम्पुटर चे प्राथमिक ज्ञान, कागदाच्या पिशव्या बनवणे, कागदाची फुले बनवणे, ओरिगॅमी इत्यादी कौशल्यांचे शिक्षण दिले जाते.
या शिक्षणामुळे बालेवाडीचा कोर्स पूर्ण केल्यावर प्रशिक्षणार्थींना अधिकृत प्रमाणपत्र दिले जाते. त्या योगे त्यांना चांगली नोकरी मिळू शकते हा कोर्स ११ महिन्यांचा आहे.